सुस्मिता वडतिले
अभिनेत्री रुबीना दिलैकनं (Rubina Dilaik) नुकतंच एक लेटेस्ट फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप प्रचंड व्हायरल होत आहेत.
फोटोशूटमधून रुबीना दिलैकने अतिशय सुंदर साडी नेसलीय, ज्याची खूप चर्चा होत आहे. या फोटोंमध्ये रुबीना अतिशय एलिगेंट दिसत आहे.
हा सुंदर लूक पूर्ण करण्यासाठी रुबीनाने चोकर नेकलेस आणि इअर रिंग्स कॅरी केलीय. त्याचबरोबर छोटी बिंदी आणि लाइट लिप शेड मुळे तिचा लूक परफेक्ट दिसत आहे.
टीव्हीवरील सिरिअल्स 'छोटी बहू' व 'शक्ती : अस्तित्व के एहसास की' अशा सिरिअल्समधून घराघरात पोचलेल्या अभिनेत्री रुबिना दिलैकने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
'बिग बॉस सीझन 14'ची विजेती झाल्यावर तर रुबिनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली.
सोशल मीडियावरही तिच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे.
रुबिनाचा अभिनयच नव्हे तर तिच्या स्टायलिश अदाचेही लोक दिवाने झाल्याचे दिसून येते.
अॅक्टिंग व शूटिंगदरम्यानच नव्हे तर रुबिना तिच्या वैयक्तिक जीवनातही खूपच स्टायलिश व ग्लॅमरस जीवन जगते.
रुबिनाने नेहमीच स्टायलिश फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
इंडियनपासून वेस्टर्न लूकपर्यंत रुबिनाने सोशल मीडियावर नवा ट्रेंड आणला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.