भक्ती सोमण-गोखले
थंडीत हेल्दी राहण्यासाठी अनेकजण विविध उपाय करत असतात. जर योग्य आहार घेतलात तर तुम्ही फिट राहून रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होऊ शकते. म्हणून सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकरने इंस्टाग्राम पोस्टमध्ये आहारात कोणत्या घटकांचा समावेश करावा ते सांगितले आहे.
उस- आपले सर्वात जुने डिटॉक्स फूड म्हणजे उस. उस खाल्ल्याने यकृताला पुनरुज्जीवन मिळते. तसेच हिवाळ्याच्या त्वचा चमकदार राहते.
बोरं- बोरं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. त्यामुळे लहान मुलांनी बोरं आवर्जून खावीत. तसेच यामुळे आपल्या आहारातील विविधता सुधारते.
चिंच- चिंच पचनास अतिशय चांगली असते. चिंचेच्या बिया ताकात मिसळून पिणे अतिशय पौष्टिक असते.
आवळा- हिवाळ्यात अतिशय महत्वाचा असलेला घटक. तुम्हाला कोणतेही इंफेक्शन झाले असेल तर आवळा खाल्ल्याने उतार पडतो. तुम्ही आवळ्याचे च्यवनप्राश, सरबत, मुरांबा असे पदार्थ करू शकता.
तिळगुळ- हिवाळ्यात केला जाणारा अतिशय चविष्ट पदार्थ. हाडे आणि सांधे निरोगी ठेवण्यासाठी तिळगूळ खाणे चांगले मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.