सुष्मिता सेन ते समंथा.. वर्षभरात 'हे' सेलिब्रिटी पार्टनरपासून झाले विभक्त

स्वाती वेमूल

आमिर खान-किरण राव : आमिर आणि किरण यांनी १५ वर्षांच्या संसारानंतर जुलै महिन्यात घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतरही मुलगा आझादसाठी नेहमीच एकत्र येणार असल्याचं केलं स्पष्ट

समंथा- नाग चैतन्य: ऑक्टोबर महिन्यात या दोघांनी घटस्फोट जाहीर करत सर्वांना धक्का दिला.

एप्रिल महिन्यात अभिनेत्री किर्ती कुल्हारी पती साहिल सेहगलपासून विभक्त झाली.

जवळपास तीन वर्षे डेट केल्यानंतर सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांचं ब्रेकअप झालं.

'आमची सुरुवात मैत्रीपासून झाली, आम्ही कायम एकमेकांचे मित्र राहू', असं सुष्मिताने सोशल मीडियावर लिहिलं.

तुर्कीमध्ये २०१९ मध्ये नुसरत जहाँ आणि निखिल जैनचं लग्न झालं. यावर्षी मार्चमध्ये निखिलने नुसरतवर अप्रामाणिक असल्याचा आरोप करत लग्न मोडण्यासाठी तक्रार दाखल केली.

२०११ मध्ये गायक हनी सिंगचं शालिनी तलवारशी लग्न झालं. शालिनीने हनी सिंगवर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप केले. दोघांची विभक्त होण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

करण मेहरावर निशा रावलने कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले. हे दोघं सध्या वेगळे राहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.