कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या SUV

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून मध्यम आकाराच्या एसयूव्हींची मागणी झपाट्याने वाढली आहे, आज आपण काही चांगले ऑप्शन्स पाहाणार आहोत.

टाटा नेक्सॉन लोकप्रिय मध्यम आकाराची suv आहे, यात 149CC इंजिन आहे, ज्याला पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही पर्याय दिले आहेत.

या कारमध्ये तुम्हाला 1.2 लीटर पेट्रोल इंजिन 120 PS पावर आणि 179NM पीक टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत 7.55 लाख रूपयांपासून ते 13.90 लाखापर्यंत जाते.

Hyundai Venue च्या इंजिन आणि पावरबद्दल बोलायचे झाल्यास यात 1493ccचे इंजिन देण्यात आले आहे.

ही कार कंपनीने 6.99 लाखांच्या किंमतीसह लॉंच करण्यात आली आहे, जी 11.72 लाखांपर्यंत जाते.

मारूती विटारा ब्रेझा ही कार सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. यात इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे

कंपनीने यामध्ये 1462 सीसी इंजिन दिले असून ते 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 105 PS पावर आणि 138 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत 7.84 लाख रूपयांपासून सुरू होते जी 11.49 लाखांपर्यंत जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.