भक्ती सोमण-गोखले
थंडी सुरू झाल्यावर काहीतरी गरम प्यावेसे वाटते. या काळात भाज्या मुबलक आणि ताज्या मिळतात. त्यामुळे या काळात वेगवेगळ्या भाज्यांचे सूप प्यायला अनेकजण पसंती देतात.
टोमॅटो सूप- ऑल टाईम फेवरेट म्हणून हे सूप कुठल्याही सिझनला पिता येते. पण थंडीत हे सुप पिण्याची मजा वेगळीच आहे.
गाजर सूप- थंडीत गाजर अतिशय छान येतात. या गाजरामध्ये थोडा भोपळा, टोमॅटो घालून सूप करता येते.
लेमन कोरिएंडर सूप- थंडीत कोथिंबीर अतिशय चांगली आणि ताजी असते. या कोथिंबीरीत भाज्या आणि लिंबू एकत्र करून हे सूप करता येते.
पालक सूप- पालकही या काळात ताजा मिळतो. त्याचे सूप अतिशय चविष्ट लागते.
बिटाचे सूप- बीटात गाजर घालून केलेले हे सूप पौष्टीक आणि चविष्ट लागते.
मशरूम सूप- मशरूमही या काळात ताजे मिळतात. मशरूम आणि क्रिम एकत्र करून केलेले हे सूप अनेकांना आवडते.
मिक्स व्हेज सूप- भाज्या आणि स्वीट कॉर्न घालून केलेले हे सूप लहान मुलंनाही खूप आवडते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.