अर्चना बनगे
भाज्या फक्त खाण्यासाठीच फायदेशीर असतात असे नाही तर याचा उपयोग स्किन ग्लोसाठी देखील होतो.जाणून घेऊया कोणत्या भाज्यांचा समावेश करावा.
आवळा :
आवळ्यात व्हिटामीनचे प्रमाण जादा असते, ज्याचा फायदा कोलेजन वाढवण्यास होतो. यामुळे त्वचा खुलण्यास मदत होते.
लिंबू :
लिंबामध्ये व्हिटामीन सीचे प्रमाण जादा असते. यामुळे डाग, पिंपल्स तसेच चेहऱ्याच्या अनेक सम्यसा दूर होतात.
पालक :
पालकमध्ये अॅन्टीआॅक्सीडेंटचे प्रमाण जादा असते. जे चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होण्यास मदत करतात.
गाजर :
गाजराचा ज्यूस पिल्याने चेहरा सुंदर दिसण्यास मदत होतो. तर गाजर खाल्याने चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होण्यास देखील मदत होते.
बीट :
बीटमध्ये अॅन्टीआॅक्सीडंट असते जे चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होण्यास मदत करते. शिवाय स्किन ग्लो करण्यास सुरुवात होते.
दुधी भोपळा :
दुधी भोपळ्यात पाण्याचे प्रमाण जादा असते. शिवाय कॅलरीजचे प्रमाण कमी असते. याला डायटमध्ये समावेश करा.
टोमॅटो :
टोमॅटो नियमित खाल्याने चेहऱ्यावरील ओपन पोर्स बंद होण्यास मदत होते. शिवाय तुम्हाला नियमित ताजेतवाणे वाटेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.