आशुतोष मसगौंडे
पूर्वी एक म्हण होती की, जो तूप खाईल त्याला रुप येईल. कारण पूर्वी लोक रोजच्या जेवणात तुपाचा भरपूर वापर करायचे.
तूप केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर शरीर निरोगी ठेवण्यासही मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-डी आणि व्हिटॅमिन-ई आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.
तुपामुळे त्वचेची चमक कायम राहते. याशिवाय पिंपल्स आणि डार्क सर्कलच्या समस्येपासूनही तुम्हाला आराम मिळू शकतो.
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि इतर अनेक पोषक घटक तुपात आढळतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. याचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा दीर्घकाळ ताजी ठेवू शकता.
नियमितपणे चेहऱ्यावर तुपाची मसाज केल्यास त्वचेची आर्द्रता कायम राहते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि फॅटी ॲसिड त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
तुपाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करू शकता. यासाठी तुपात काही थेंब पाणी टाकून ते चेहऱ्यावर हलक्या हाताने लावू शकता.
जर चेहऱ्यावर खाज येण्याची समस्या असेल तर तूप लावल्याने यापासून मुक्ती मिळू शकते. डोळ्यांखालील काळे डाग घालवण्यासाठीही तूप फायदेशीर ठरते.
फ्रिकल्स दूर करण्यासाठी तूप खूप उपयुक्त आहे. जर चेहऱ्यावरील डागांमुळे कोणी त्रस्त असेल तर ते दररोज चेहऱ्यावर तूप लावून यापासून मुक्ती मिळू शकते.
तुपामध्ये आवश्यक फॅटी ऍसिडमध्ये असतात. जे त्वचेला आतून पोषण करण्यास मदत करतात. दररोज सकाळी तुपाचे सेवन केल्याने त्वचेची गुणवत्ता टिकून राहते.