Sandip Kapde
लालबागचा राजा हा जगभर प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी मुंबईतील लालबाग परिसरात गणेशोत्सवात स्थापित केला जातो.
हा गणपती "नवसाचा गणपती" म्हणून ओळखला जातो, म्हणजेच नवसाला पावणारा गणपती.
दररोज अंदाजे १५ लाख भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात, कारण लोकांचा विश्वास आहे की तो सर्व इच्छा पूर्ण करतो.
१९३४ पासून लालबाग गणेशोत्सव साजरा केला जात आहे आणि या गणपतीला 'लालबागचा राजा' म्हटले जाते.
दरवर्षी विविध थीम आणि डिझाइनवर आधारित गणेश मूर्तीची स्थापना येथे केली जाते.
१९३४ ते १९४४ मधील लालबागचा राजाच्या दुर्मिळ आणि ऐतिहासिक प्रतिमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत.
१९४२ मध्ये लालबागच्या राजाची मूर्ती भगवान विष्णूच्या रूपात दर्शविली गेली होती.
१९४३ ते १९४५ दरम्यानच्या मूर्तींच्या डिझाइनमध्ये विविधता होती आणि कांबली आर्ट्सने या मूर्ती बनवल्या होत्या.
१९४६ ते १९४९ दरम्यान, लालबागच्या राजाच्या मूर्तीमध्ये महात्मा गांधीसारखे चेहरे आणि बैलगाडी चालविणारा गणपती दिसला होता.
१९५७ ते १९६० दरम्यान लालबागचा राजा कधी कृष्णाच्या तर कधी नारायणाच्या रूपात दिसला, आणि दरवर्षी त्याची डिझाइन नव्याने साकारली गेली.