सकाळ डिजिटल टीम
बारसू (ता. राजापूर) आणि चवे (ता. रत्नागिरी) येथील कातळ खोदचित्रांना (Katal Shilp Konkan) राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे.
त्यानंतर आता दक्षिण रत्नागिरीत (South Ratnagiri) राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे दापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळू लागली आहेत.
रत्नागिरीच्या (Ratnagiri) दापोलीमधील उबर्ले गावात काही कातळशिल्प (Katalshilp) आढळली आहेत. अभ्यासकांच्या दाव्यांनुसार, ही कातळशिल्प सुमारे 10 हजार वर्षांपूर्वीची आहेत.
'गाढवाचा खडक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबर्ले गावामध्ये ही कातळशिल्प जांभ्या सड्यावर आढळली आहेत.
यामध्ये 6 कातळशिल्पांचा देखील समावेश आहे. मानवासह तीन हरीण आणि 2 बैल देखील आढळली आहेत. सातपैकी एक कातळशिल्प सुमारे 17 फीट लांबीचं आहे.
मंडणगडमधील (Mandangad) बोरखत गावामध्येही एक कातळशिल्प आढळलंय. कोकणात यापूर्वी राजापूर, रत्नागिरी, लांजा या पट्ट्यात कातळशिल्प आढळली आहेत.
कोकणात विविध भागात सुमारे 1500 पेक्षा अधिक कातळशिल्प आहेत. पण, तशीच कातळशिल्प दापोली आणि मंडणगडमध्येही आढळली असल्याने त्याबद्दल कुतूहल अधिक वाढलंय.