Amit Ujagare (अमित उजागरे)
भारतात पहिली लिफ्ट अर्थात उद्वाहक 124 वर्षांपूर्वी उभारण्यात आली. या लिफ्टचा इतिहास जाणून घेऊयात.
1900 साली मुंबईतील राजबाई टॉवरमध्ये ब्रिटिशांनी ही लिफ्ट बसवण्यात आली होती. या काळात लिफ्ट्सचा वापर जगभरात केवळ काही ठिकाणीच होत होता.
ज्या राजबाई टॉवरमध्ये ही लिफ्ट बसवली होती तो टॉवर मुंबई विद्यापीठीच्या कॅम्पसमध्ये आहे.
या टॉवरची रचना गोथिक आर्किटेक्चरवर आधारित होती, यामध्ये उंच टॉवरवर भलं मोठं घड्याळं बसवलं जातं.
पसिसरातील नागरिकांना या घड्याच्या माध्यमातून वेळ किती झालीए हे जाणून घेता येतं. या टॉवरचं बांधकाम 1878 साली पूर्ण झालं होतं.
सुमारे 85 मीटर अर्थात 280 फूट उंचीच्या या टॉवरमध्ये लिफ्ट बसवणं त्या काळात एक मोठं इंजिनिअरिंगचं काम मानलं जात होतं.
त्याकाळी लिफ्ट्स हाताने चालवल्या जात. राजभाई टॉवरमध्ये बसवलेली लिफ्ट देखील पूर्णपणे मॅन्युअल होती. त्यासाठी एक लिफ्टमन असायचा.
या लिफ्टचा वापर टॉवरमधील उंच मजल्यांवर विद्यापीठातील कर्मचारी, प्राध्यापक आणि विशिष्ट व्यक्तींना जाण्यासाठी केला जात असतं.
त्याकाळी लिफ्टचं तंत्रज्ञान पूर्णपणे यांत्रिक होतं. त्यात आजच्यासारखे कोणतेही आधुनिक सुरक्षा फीचर नव्हते.
त्याकाळी भारतात लिफ्ट बसवणं हे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगतीचं एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात होतं.