आशुतोष मसगौंडे
१७ फेब्रुवारी १८८१ या दिवशी ब्रिटिशांनी संपूर्ण हिंदुस्तानभर जी दुसरी दसवर्षीय जनगणना केली, त्यानुसार मुंबईमध्ये फक्त ७ लाख ७३ हजार लोक राहत होते.
आज दीड कोटी लोकसंख्येचा पल्ला गाठणारी मुंबई, तिची लोकसंख्या एकेकाळी आठ लाखही नव्हती, हे कोणाला खरेही वाटणार नाही.
१४३ वर्षांपूर्वी मुंबई बेटावर फक्त ७ लाख ७३ हजार १९८ लोक राहत होते. पुढे वीस वर्षानंतर म्हणजेच १९०१ च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या ७ लाख ७६०६ च्या दरम्यानच स्थिर राहिली.
७ लाख ७३ हजार १९८ पैकी हिंदू पाच लाख, मुसलमान १ लाख ५८ हजार, ख्रिश्चन ४२ हजार, कोळी २३ हजार तर कुणबी–मराठा १ लाख ७८ हजार इतके होते.
ही लोकसंख्या फक्त मुंबई बेटाची म्हणजेच माहीम पासून ते शिव, तसेच सायन ते कुलाब्या पर्यंतच्या भागातली होती.
आजच्या धारावीत म्हणजेच तेव्हाच्या कुंभारवाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांची वस्ती सर्वात घनदाट होती
फाईव्ह गार्डन पासून ते आजच्या सायन पर्यंत तेव्हा खूप मोठे जंगल होते. त्यामुळे या अगदी बाजूच्याच भागातील लोकसंख्या खूप विरळ होती. दरम्यान याबाबतची माहिती माजी अधिकारी विश्वास पाटील यांच्या एक्स पोस्टवरून घेण्यात आली आहे.