कार्तिक पुजारी
सायबर फ्रॉडचे एक नवे प्रकरण समोर आलं आहे. पुण्यातील एका तरुणाला १६ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे
तरुणाला वॉट्सअॅपवर एक मेसेज आला होता. यात पार्ट टाईम जॉबची ऑफर देण्यात आली होती
यूट्यूब चॅनलवर व्हिडिओंना लाईक आणि कमेंट करण्यासाठी ५० रुपये देण्याचे त्याला प्रलोभन देण्यात आले होते.
सुरुवातीला तरुणाला काही गिफ्ट्स वगैरे देण्यात आले. त्यामुळे तो भुलला.
त्यानंतर तरुणाला एका टेलिग्राम ग्रुपवर जॉईन होण्यास सांगण्यात आलं. याठिकाणी त्याला रेजिस्ट्रेशनसाठी छोटी पेमेंट करण्यास सांगण्यात आलं
त्यानंतर तरुणाच्या अकाऊंटमधून १६ लाख रुपये काढून घेण्यात आले.
तरुणाला आपण फसल्याची जाणीव झाली. त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली