Aishwarya Musale
अमित भडाना भारतातील प्रसिद्ध YouTubers पैकी एक आहे. फरिदाबादमध्ये जन्मलेल्या अमितची फॅन फॉलोइंग चांगली आहे.
अमितला त्याच्या देसी स्टाइलमुळे लोक पसंत करतात. सामान्य कुटुंबातील अमित भडानाने 'लॉ' चं शिक्षण घेतलं आहे.
अमितने काही काळापूर्वी एका पॉडकास्ट दरम्यान आपल्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सांगितले होते.
अमितने 22 किलो वजन कमी केल्याचे सांगितले होते.
अमितचे वजन 92 किलो होते, जे त्याने 70 पर्यंत कमी केले.
अमितने वजन कमी करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत अवलंबली होती.
अमितने सांगितले की त्याने 70 दिवसात वजन कमी केले. वजन कमी करण्यासाठी अमितने संध्याकाळी ५ नंतर खाणे बंद केले होते.
अमित पहिलं जेवण सकाळी 10 वाजता आणि दुसरं जेवण दुपारी 12 वाजता करायचा.
वजन कमी करण्यासाठी अमितने कधीही जिम जॉईन केली नाही. तो रोज फक्त ५ किलोमीटर धावायचा.