Anuradha Vipat
टीव्ही पॉवर कपल अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलीक लवकरच आई-वडील होणार आहेत.
अभिनवने सांगितले की, त्याने 3 वर्षे भरपूर स्मोकिंग केले होते, पण त्यानंतर 2012 मध्ये त्याने सिगारेट सोडली.
त्याने हा आपल्या आयुष्यातील पहिला सर्वोत्तम निर्णय असल्याचे म्हटले आहे. अभिनवने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले - मी 3 वर्षे भरपूर धूम्रपान केले. मी 2012 मध्ये धूम्रपान सोडले. पहिला निर्णय शक्य झाला नसता तर दुसरा सर्वोत्तम निर्णय घेता आला नसता, कारण रुबीला धूम्रपान आणि धूम्रपान करणाऱ्यांचा तिरस्कार आहे.
मी धूम्रपान सोडण्यात दोनदा अयशस्वी झालो, पण तिसर्यांदा ते घडले. जर मी ती वाईट सवय चालू ठेवली असती तर मी गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग आणि ट्रेकिंग करू शकलो नसतो.
अभिनव आणि रुबीना यांनी सप्टेंबरमध्ये प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.
तेव्हापासून रुबिना तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर करत असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.