Swadesh Ghanekar
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला आयपीएल २०२५ मेगा ऑक्शपूर्वी दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केले.
ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदावर कायम राहण्याची विनंती केली होती. शिवाय कोचिंग स्टाफच्या निवडीत सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
फ्रँचायझी त्याच्या ट्वेंटी-२०तील कामगिरीवर पूर्णपणे समाधानी नव्हती, त्यामुळे त्याला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला.
ऋषभ पंत करारमुक्त झाल्याने आता त्याला अनेक फ्रँचायझींनी करारबद्ध करण्यात स्वारस्य दाखवले आहे आणि लिलावात त्याला जास्त मागणी असेल.
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२५ लिलावापूर्वी श्रेयस अय्यरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून ऋषभचा विचार करू शकतात.
केवळ दोन खेळाडूंना रिटेन करणाऱ्या पंजाब किंग्सने सुरुवातीपासूनच संघ बांधणीवर भर दिला आहे. ऋषभ पंतला त्यांनी करारबद्ध केल्यास त्यांचा कर्णधाराचा प्रश्न मिटेल.
LSG ने लोकेश राहुलला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जागा इथेही रिकामी झाली आहे.निकोलस पूरन संघात आहे, परंतु तरीही फ्रँचायझी ऋषभचा विचार करू शकते.
CSK त्यांच्या संघात MS Dhoniचा पुढचा वारसदार याचा शोध घेत आहे. ऋषभ ऑक्शनमध्ये आल्याने यापेक्षा चांगली संधी त्यांच्याकडे नसू शकते.
हाती आलेल्या वृत्तानुसार २४-२५ नोव्हेंबरला रिहाद येथे मेगा ऑक्शन होणार आहे.