सकाळ डिजिटल टीम
दिवाळी सणासाठी अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत. यंदा 29 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत आहे.
तुम्हालाही दिवाळीचा सण तुमच्या कुटुंबासोबत अप्रतिम हिल स्टेशनच्या दऱ्याखोऱ्यात साजरा करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला काही उत्तम हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत.
बरेच लोक सर्वप्रथम हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमल्याला पोहोचतात. दिवाळीसाठी हे सर्वात सुरक्षित हिल स्टेशन मानले जाते. दिवाळीनिमित्त येथे रोषणाईही केली जाते.
तुम्हाला उत्तराखंडच्या सुंदर खोऱ्यांमध्ये दिवाळी साजरी करायची असेल, तर तुम्ही मसुरीला पोहोचलं पाहिजे. हे सुंदर हिल स्टेशन पर्वतांची राणी म्हणूनही ओळखले जाते. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमधून लोक दिवाळी साजरी करण्यासाठी मसुरीला पोहोचतात.
समुद्रसपाटीपासून 4 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर दिवाळी साजरी करण्यात एक वेगळीच मजा आहे. धर्मशाळा असं ठिकाण आहे, जिथं दिवाळी साजरी करण्यासाठी स्थानिकच नाही तर परदेशी पर्यटकही येतात.
भारताव्यतिरिक्त परदेशात योग नगरी म्हणून ओळखले जाणारे ऋषिकेश हे दिवाळी साजरी करण्यासाठी सर्वोत्तम हिल स्टेशन मानले जाते. गंगा नदीच्या काठावर वसलेले हे हिल स्टेशन आपल्या सौंदर्याने दररोज हजारो लोकांना आकर्षित करते. दिवाळीनिमित्त त्रिवेणी घाटापासून लक्ष्मण झुला आणि राम झुला ते भारत मंदिरापर्यंत रंगीबेरंगी दिव्यांची सजावट केली जाते.
नैनिताल हे देशातील असेच एक हिल स्टेशन आहे, जिथे दिवाळी साजरी करणे महत्त्वाचे मानले जाते. नैनितालमध्ये विशेषत: मॉल रोडवर दिवाळीचा झगमगाट पहायला मिळतो. येथे दिवाळी साजरी केल्यानंतर, तुम्ही दुसऱ्या दिवशी नैनी तलावात बोटिंगला जाऊ शकता.