भारतीय संघात निवड झाली नाही म्हणून हे 5 खेळाडू आहे जाम खूष!

अनिरुद्ध संकपाळ

बीसीसीआयने नुकतेच एशियन गेम्ससाठी भारताच्या महिला आणि पुरूष क्रिकेट संघाची घोषणा केली.

bcci

बीसीसीआयने चीनमध्ये होणाऱ्या या टी 20 फॉरमॅटधील स्पर्धेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे.

jay shah

ऋतुराज गायकवाड

या संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे दिले आहे. या संघात अनेक अनुभवी खेळाडूंना घेण्यात आलेलं नाही. मात्र ही त्यांच्यासाठी खूषखबर ठरत आहे.

ruturaj gaikwad

भुवनेश्वर कुमार

एशियन गेम्ससाठीच्या भारतीय पुरूष संघात भुवनेश्वर कुमारला संधी मिळालेली नाही. मात्र तरी देखील तो खूष आहे कारण त्याचा भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी विचार केला जाऊ शकतो.

bhuvneshwar kumar

संजू सॅमसन

संजू सॅमसन सॅमसनला देखील एशियन गेम्ससाठीच्या संघात निवडण्यात आलेले नाही. याचा अर्थ निवडसमिती संजू सॅमसनचा देखील वनडे वर्ल्डकपसाठी विचार करत आहे.

sanju samson

शिखर धवन

भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन ज्यावेळी रोहित अन् हार्दिक पांड्या सुट्टीवर असतात किंवा दोन मालिका क्लॅश होणार असतील त्यावेळी भारताच्या दुय्यम संघाचे नेतृत्व करत होता. त्याला वनडे वर्लडकप खेळण्याची जबर इच्छा आहे. निवडसमितीने एशियन गेम्ससाठी त्याची निवड न करता त्याचे हे स्वप्न सध्या तरी जीवंत ठेवलं आहे.

shikhar dhawan

उमरान मलिक

भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज उमरान मलिकला देखील एशियन गेम्सच्या संघात स्थान नाहीये. यामुळे त्याच्या देखील भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप खेळण्याच्या स्वप्नाला बळ मिळालं आहे.

umran malik

अक्षर पटेल

भारतीय संघातील डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजा वनडे वर्ल्डकप खेळणार यात काही शंका नाही. मात्र त्याचा बॅकअप प्लॅन म्हणून आपले अष्टपैलूत्व सिद्ध केलेला अक्षर पटेलकडे पाहिले जाते. त्याचाही एशियन गेम्ससाठीच्या भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Axar Patel