सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात ताजतवान जेवण घेणं गरजेचं आहे. अश्यात जेवणासोबत सॅलड हा उत्तम पर्याय आहे.
घरच्या घरी सॅलड बनवणं सोपं आहे, पौष्टिक आहे.
आज आपण उन्हाळ्यासाठी ५ उत्तम सॅलड रेसिपी पाहूया
हा सॅलड बनवण्यासाठी काकडी, टोमॅटो, कांदे, मिरची आणि लिंबाचा रस वापरला जातो.हे बनवणं अतिशय सोपं आहे आणि थोड्याच वेळात तयार होतं.
या सॅलडमध्ये आपण आपल्या आवडीनुसार विविध प्रकारची फळे वापरू शकता. उन्हाळ्यात आंबट आणि गोड चवीचे हे सॅलड उत्तम पर्याय आहे.
पास्ता, भाज्या आणि चीज वापरून बनवलेला हा सॅलड पौष्टिक आणि स्वादिष्ट बनतं.
लंच किंवा डिनरसाठी हा उत्तम पर्याय आहे.
कलिंगड, थोडे चीझ आणि पुदिन्याची पानं टाकून बनवलेलं सॅलड अतिशय चविष्ट लागत. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी हे सॅलड उपयुक्त आहे.
क्विनोआ एक पौष्टिक धान्य आहे आणि त्यापासून बनवलेला सॅलड प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे.भाज्या, नट्स आणि चीज वापरून तुम्ही हा सॅलड अधिक स्वादिष्ट बनवू शकता.
सॅलड बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार विविध प्रकारच्या भाज्या, फळे आणि नट्स वापरू शकता.