सकाळ डिजिटल टीम
आज १ ९ ऑगस्टला सगळेचजण रक्षाबंधनचा सण उत्साहाने साजरा करत आहेत. आज तुमच्या भावंडांबरोबर एखादा चांगला सिनेमा बघण्याचा प्लॅन तुम्ही करत असाल तर हे सिनेमे नक्की बघा.
झोया अख्तरचं दिग्दर्शन असलेला दिल धडकने दो हा सिनेमा एक खूप सुंदर सिनेमा आहे. कुटूंबातील बॉण्डिंग, समस्या यावर हा सिनेमा भाष्य करतो.
यात रणवीर आणि प्रियंकाने साकारलेल्या बहीण-भावंडांचं बॉण्डिंग तुम्हाला तुमच्या भावंडांशी असलेल्या बॉण्डची आठवण करून देईल.
जॅकी श्रॉफ, सलमान खान, रंभा यांची मुख्य भूमिका असलेला बंधन या सिनेमाची गोष्टसुद्धा बहीण-भावाच्या नात्यावर आधारित आहे.
बहिणीच्या प्रेमाला विरोध करणारा मोठा भाऊ नंतर तिच्या रक्षणासाठी कसा उभा राहतो याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल.
भावंडांमधील बॉण्ड कसा असावा याची गोष्ट सांगणारा हम साथ साथ है हा सिनेमा तुम्ही आज जरूर एन्जॉय करू शकता. एकत्र कुटूंब पद्धतीचं महत्त्व आणि भावंडांमधील प्रेम यावर हा सिनेमा भाष्य करतो.
चार बहिणी आणि त्यांच्या एकुलत्या एक भावाची गोष्ट सांगणारा रक्षाबंधन हा सिनेमा आज तुम्ही पाहायलाच हवा. बहिणीसाठी स्वतः लग्न न करणाऱ्या आणि मृत बहिणीला न्याय मिळवून देणाऱ्या भावाची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल.
अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
राजशेखरन आणि त्याची धाकटी बहीण राधा यांच्या गोड भावा-बहिणीच्या नात्याची गोष्ट तुम्हाला पसामलार या दाक्षिणात्य सिनेमात पाहायला मिळेल. शिवाजी गणेशन आणि सावित्री गणेशन यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.