सकाळ डिजिटल टीम
या १ ५ ऑगस्ट २ ० २ ४ ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७ ८ वर्षं पूर्ण होणार आहे. या स्वातंत्र्यदिनाला तुम्ही कोणते देशभक्तीपर सिनेमे आणि वेबसिरीज एन्जॉय करू शकता पाहूया.
स्वतंत्रवीर सावरकर
अभिनेता आणि दिग्दर्शक रणदीप हुडाचं दिग्दर्शन असलेला स्वातंत्रवीर सावरकर हा सिनेमा तुम्ही उद्या स्वातंत्र्यदिनादिवशी पाहू शकता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सुपरहिट सिनेमात रणदीपबरोबर अभिनेत्री अंकिता लोखंडेचीही मुख्य भूमिका आहे.
रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेली वेबसिरीज इंडियन पोलीस फोर्स ही वेबसिरीजही तुम्ही एन्जॉय करू शकता. सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांची या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका आहे.
मनोज वाजपेयी यांची गाजलेली फॅमिली मॅन ही मस्त वॉच वेबसिरीज आहे. या वेबसीरिजचे आतापर्यंत २ सीजन रिलीज झाले आहेत.
मिलिटरी ट्रेनिंग घेणाऱ्या दोन कॅडेटची गोष्ट नाम, नमक और शान ही वेबसिरीज तुम्ही अमेझॉन मिनी टीव्हीवर एन्जॉय करू शकता.
अभिनेत्री सारा अली खानची मुख्य भूमिका असलेला ए वतन मेरे वतन हा सिनेमा अमेझॉनवर पाहता येईल. स्वातंत्र्यलढ्यात छुपं रेडिओ स्टेशन चालवणाऱ्या उषा मेहता यांची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
रक्षक इंडियाज ब्रेव्ह चॅप्टर १ ही सिरीज तुम्हाला अमेझॉन मिनी टीव्हीवर पाहता येईल. भारताचं रक्षण करण्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या रिअल लाइफ हिरोवर ही सिरीज आधारित आहे.
एका स्पेशल ऑपरेशनसाठी काम करणारे पाच रॉ एजंट्स यांची गोष्ट या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळेल.