'ही' आहेत जगातील 7 नैसर्गिक आश्चर्ये, जी तुम्हाला पाहायला नक्कीच आवडतील!

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही जगातील 7 आश्चर्यांबद्दल खूप ऐकलं असेल, परंतु आज आम्ही तुम्हाला जगातील काही नैसर्गिक आश्चर्यांबद्दल सांगणार आहोत.

7 Natural Wonders of the World

कोलंबियाची कानो क्रिस्टेल्स (Caño Cristales) नदी 'स्वर्गातून पळून गेलेली नदी' म्हणून प्रसिद्ध आहे. अॅटलसच्या मते, मॅकेरेनिया क्लेविगेरा नावाची वनस्पती नदीच्या खाली वाढते आणि जेव्हा ती फुलते, तेव्हा गुलाबी रंगात बदलते. त्यानंतर नदीचा रंग सामान्य निळ्यापासून चमकदार गुलाबी आणि नंतर लाल रंगात बदलतो.

7 Natural Wonders of the World

पॅटागोनिया येथील संगमरवरी गुहा तुम्हाला भुरळ घालतील. इथं चमकदार रंगाच्या भिंती आहेत, ज्या बर्फाच्या निळ्या तलावाच्या पाण्याभोवती आहेत. फक्त बोटीनेच इथे पोहोचता येते.

7 Natural Wonders of the World

मध्य अझरबैजानमध्ये असलेल्या गोबुस्तान नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला मातीचे ज्वालामुखी आढळतील. हा ज्वालामुखी मिथेन आणि चिखलाने झाकलेला दिसतो.

7 Natural Wonders of the World

पामुक्कले हे तुर्कीच्या डेनिझली प्रांतातील एक गाव आहे, जिथं जगातील सर्वात गरम झरे आढळतात. पामुक्कलेला 'कॉटन कॅसल' असंही म्हटलं जातं.

7 Natural Wonders of the World

पेइटो लेक हे कॅनडाच्या प्रसिद्ध बॅन्फ नॅशनल पार्कमधील हिमनदीपासून तयार झालेलं सरोवर आहे. ते त्याच्या मनमोहक निळ्या रंगासाठी ओळखला जातं.

7 Natural Wonders of the World

व्हिएतनाममधील टोंकीनच्या आखातामध्ये स्थित 'लाँग बे' हे सुंदर ठिकाण आहे. 1500 पेक्षा जास्त मोठ्या चुनखडीच्या बेटांनी बनलेलं हे बेट खूप लोकांना आकर्षित करतं. इथं आल्यावर स्वर्गाचा भास होतो, असं म्हणतात.

7 Natural Wonders of the World

ऑस्ट्रेलियातील हिंद महासागराच्या अवघ्या काही फूट अंतरावर असलेलं लेक हिलियर (Lake Hillier, Australia). ऑस्ट्रेलिया हे लाल रंगासाठी प्रसिद्ध आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, तलावाच्या पाण्यात राहणारे बॅक्टेरिया लाल द्रव सोडतात, ज्यामुळं त्याचा रंग लाल दिसतो.

7 Natural Wonders of the World

कोकणात अंजनीची फुले बहरली! मनमोहक गुलाबी, जांभळ्या फुलांनी वेधलं लक्ष

येथे क्लिक करा