Mobile Care Monsoon : पावसाळ्यात 'या' 7 टिप्स वापरून घ्या तुमच्या मोबाईलची काळजी!

Saisimran Ghashi

पावसाळा थंडगार आणि रोमँटिक ऋतू असला तरी, आपल्या मोबाईल फोनसाठी तो धोकादायकही असतो.

जास्त पाऊस आणि ओलसर हवामानामुळे तुमचा महागडा स्मार्टफोन खराब होऊ शकतो.

तुमच्या मोबाईलची काळजी कशी घ्यावी याच्या 7 सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पाणी आणि धूळ टाळा

पावसात बाहेर जाताना मोबाईल खिशात ठेवा आणि पाऊस आल्यास त्वरित छत्री घ्या. मोबाईल भिजू देऊ नका.

वॉटरप्रूफ पाउच वापरा

पावसाळी सफारीसाठी वॉटरप्रूफ पाउचमध्ये मोबाईल ठेवा.

पोर्ट स्वच्छ ठेवा

पाऊस आणि धुळीमुळे पोर्ट्स बंद होऊ शकतात. त्यामुळे नियमितपणे पोर्ट स्वच्छ करा.

ड्राय केस वापरा

मोबाईल भिजला तर ताबडतोब ड्राय केस वापरून तो कोरडा करा.

चार्जिंग टाळा

भिजलेला फोन चार्ज करू नका. शॉर्ट सर्किट होऊ शकतं.

तापमान नियंत्रित ठेवा

थंडीत बॅटरी लवकर संपते. म्हणून, मोबाईल थंड ठिकाणी ठेवा आणि गरजेनुसार पॉवर बँक वापरा.

स्क्रीन गार्ड आणि कव्हर वापरा

स्क्रीन आणि फोनला इजा होण्यापासून वाचवण्यासाठी स्क्रिन गार्ड आणि कव्हर वापरा.

या सोप्या टिप्सचं पालन करून तुम्ही पावसाळ्यात तुमचा मोबाईल सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत ठेवू शकता.

Yoga At Home : घरीच करा 'ही' ५ सोपी योगासने, मन आणि शरीर ठेवा शांत!