Saisimran Ghashi
Instagram हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.
वाढत्या सायबर गुन्हेगारीमुळे हॅकर्स तुमचं Instagram अकाउंट हॅक करून वैयक्तिक माहिती चोरू शकतात आणि तुमच्या नावाचा गैरवापर करू शकतात.
7 चेतावणी चिन्हे आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचं अकाउंट हॅक झालं आहे का ते ओळखू शकता.
जर तुम्हाला तुमच्या योग्य ईमेल आणि पासवर्ड वापरूनही तुमच्या Instagram अकाउंटमध्ये लॉग इन करता येत नसेल तर ते हॅक झाल्याचं लक्षण असू शकतं.
तुम्हाला तुमच्या Instagram अकाउंटचा पासवर्ड बदलल्याची नोटिफिकेशन आली तर तात्काळ तुमचा पासवर्ड बदला.
जर तुम्ही तुमच्या अकाउंटमधून अनोळखी पोस्ट किंवा मेसेज पाठवले जात असल्याचं पाहिलं तर ते हॅक झाल्याचं लक्षण असू शकतं.
जर तुमचे फॉलोअर्स किंवा फॉलोइंगची संख्या तुमच्या माहितीशिवाय बदलली असेल तर ते हॅक झाल्याचं लक्षण असू शकतं.
जर तुम्हाला तुमच्या Instagram अकाउंटमधून अज्ञात ठिकाणांवरून लॉग इन केल्याची नोटिफिकेशन आली तर तत्काळ तुमचं पासवर्ड बदला आणि तुमचं अकाउंट सुरक्षित करा.
जर तुम्हाला तुमच्या Instagram अकाउंटवरून अनोळखी ऍक्टिव्हिटी दिसत असेल, जसे की तुम्ही न केलेल्या लाइक्स किंवा कमेंट्स, तर ते हॅक झाल्याचं लक्षण असू शकतं.
जर तुमच्या इंस्टाग्राम सेटिंगमध्ये तुमचे लॉगिन अन्य कोणत्या डिव्हाइसवर दाखवत असेल तर तुमचे अकाउंट कुणी दुसरी व्यक्तीदेखील ऍक्सेस करत असू शकते.