सकाळ डिजिटल टीम
आज १ ९ ऑगस्टला सगळेचजण रक्षाबंधनचा सण साजरा करत आहेत आणि सोशल मीडियावर त्यांच्या खास सेलिब्रेशनच्या स्टोरीजही शेअर करत आहेत. पण तुमच्या भावंडांच्याबरोबर असलेल्या फोटोला कोणतं गाणं वापरावं हे समजत नसेल तर जाणून घ्या या ट्रेंडिंग गाण्यांची प्लेलिस्ट.
धागों से बांधा
रक्षाबंधन या अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमातील हे गाणं तुम्हाला तुमच्या आणि लाडक्या भाऊ /बहिणीच्या बॉण्डची नक्कीच आठवण करून देईल. तुमच्या बहिणीवर किंवा भावावर असलेलं तुमचं प्रेम तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर हे गाणं नक्की वापरा.
रक्षाबंधन या सणावर आधारित असलेलं हे क्लासिक गाणं तुम्ही तुमच्या घरातील ग्रँड रक्षाबंधन सेलिब्रेशनच्या रील साठी वापरू शकता. छोटी बहन या सिनेमातील गाणं आजही तितकंच प्रसिद्ध आहे.
जाने क्यू
सध्याच्या काळात बहीण-भावाचा बॉण्ड हा मित्राच्या बॉण्डपेक्षा कमी नाही. तुमचाही तुमच्या भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर असाच बॉण्ड असेल तर दोस्ताना सिनेमातील हे गाणं तुम्ही तुमच्या इन्स्टा स्टोरी किंवा रीलमध्ये जरूर वापरा.
अतरंगी यारी
तुमचा भाऊ किंवा बहीण तुमची बेस्ट फ्रेंड असेल तर वझीर सिनेमातील अतरंगी यारी हे गाणं तुम्हाला सूट होईल. हे गाणं तुमच्या इन्स्टा रीलमध्ये असायलाच हवं.
फुलों का तारो का
हरे राम हरे कृष्णा सिनेमातील फुलों का तारो का हे आणखी एक क्लासिक गाणं आहे जे बहीण-भावांमधील गोड नातं उलगडतं. तुमचाही तुमच्या बहिणीबरोबर बॉण्ड असाच असेल तर हे गाणं तुम्ही जरूर वापरा.
बहना ने भाई कि कलाई पे
रेशम कि डोरी सिनेमातील हे क्लासिक गाणं भाऊ-बहिणीच्या नात्याचं महत्त्व सुंदरपणे अधोरेखित करतं. या गाण्याचे शब्द तुमच्या रक्षाबंधन स्पेशल रीलला अधिक उठावदार करतील.
तेरे साथ हूँ में
रक्षाबंधन सिनेमातच तेरे साथ हूँ मे हे आणखी एक गाणं भाऊ आणि बहिणीचं नातं कायम जपण्याचं वचन देतं. हे गाणं तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम रीलसाठी जरूर वापरू शकता.