Anuradha Vipat
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘फादर्स डे’ म्हणजे पितृदिन साजरा केला जात आहे
अशातच लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने लिहिलेल्या सुंदर पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मंजिरीने जुन्या आठवणींना उजाळा देत पोस्ट लिहिली आहे.
एक व्हिडीओ शेअर करत मंजिरीने लिहिलं आहे, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असं म्हणतात ना ? पण एका यशस्वी आईच्या मागे एक ‘मधे मधे न येणारा’ बाबा असतो…तू ‘तो’ बाबा आहेस प्रसाद
२/३ वर्षातून एकदाच पालक मिटिंगला जाऊन…मुलांच्या तक्रारी ऐकल्यानंतर…तिथून येताना मुलांना कबुतरांना दाणे खायला घालणारा बाबा आहेस तू असंही मंजिरीने लिहिलं आहे
पुढे मंजिरीने लिहिलं आहे, बाबाला विचारून सांगते’ असं माझ्या तोंडून ऐकल्यावर त्यावर भाबडे पणानी विश्वास ठेवणारा बाबा आहेस तू
पुढे मंजिरीने लिहिलं आहे, अचानक ‘अभ्यासाविषयी चौकशी करणारा’ आणि त्यावर ‘स्वतःच हसणारा’ बाबा आहेस तू