Anuradha Vipat
अभिनेत्री दलजीत कौरच्या वैवाहिक आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून समस्या सुरू आहेत.
दलजीतने गेल्या वर्षी मार्च महिन्यात केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी तिने दुसरं लग्न केलं होतं.
लग्नाच्या दहा महिन्यांतच दलजीत पतीला सोडून भारतात परतली आहे
आता तिने थेट निखिलवर फसवणुकीचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे.
दलजीतने निखिलविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
या एफआयआरमध्ये तिने असा दावा केला आहे की जेव्हा ती केन्याला गेली होती, तेव्हा निखिलने तिच्या मुलासोबत चुकीचा व्यवहार केला होता.
निखिलसोबत लग्न करण्यापूर्वी दलजीतने अभिनेता शालीन भनोटशी लग्न केलं होतं.