Anuradha Vipat
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.
इन्स्टाग्रामवर तेजस्विनीने काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये एका चिमुकल्या हाताने तेजस्विनीचं बोट धरल्याचं पहायला मिळत आहे
हा फोटो पोस्ट करत तेजस्विनीने आनंद व्यक्त केला आहे.
तेजस्विनीने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘माझ्यासाठीची सगळ्यात ‘मोठी’, सगळ्यात ‘खास’ आणि आयुष्यभराची ‘दिवाळी भेट’ माझ्या बहिणीने आणि दाजींने मला दिली आहे. आमच्या घरात ‘लक्ष्मी’ आली.
तेजस्विनीने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, माझ्या माणसांच्या आयुष्यातला 14 वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला.आमचे दिवाळीचे क्षणच नव्हे तर आयुष्य देखील या ‘कन्यारत्नाने’ उजळून टाकले.
तेजस्विनीने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आमच्या कुटुंबाची ‘कथा’ सुफळ संपूर्ण म्हणुया? ही दिवाळी माझ्यासाठी एकदम खास आहे, मी मावशी झालेय! होऊ दे खर्च.