लहान मुलांच्या आधार कार्डसाठी फी असते का?

Amit Ujagare (अमित उजागरे)

आधार कार्ड हे आता सर्वच नागरिकांसाठी बंधनकारक बनलं आहे. विविध योजनांचे लाभ घ्यायचे असतील तर तुमच्याकडं आधार क्रमांक आवश्यक आहे.

Child Aadhaar

लहान मुलांना देखील आधार कार्ड काढणं गरजेचं आहे. कारण त्यांना वैद्यकीय सेवेसाठी किंवा शाळेतील प्रवेशांसाठी हा आधार क्रमांक गरजेचा असतो.

Child Aadhaar

सर्वसाधारपणे नवं आधार कार्ड काढण्यासाठी किंवा जुनं कार्ड अपडेट करण्यासाठी शासनानं विशिष्ट रक्कमेची फी निश्चित केलेली आहे.

Child Aadhaar

पण जर लहान मुलांचं आधार कार्ड काढायचं किंवा ते अपडेट करायचं असेल तर फी असते का? याबाबत जाणून घेऊयात.

Child Aadhaar

आधार कार्ड काढताना लहान मुलांचे बायोमेट्रिक्स, फिंगरप्रिंट्स, डोळ्यांचे स्कॅन आणि फोटो अपडेट करण्यासाठी फी नसते. पण याची ठराविक वयोमर्यादा आहे.

Child Aadhaar

आधार अर्थात UIDAI च्या ६ फेब्रुवारी २०२३ च्या नव्या नियमानुसार, ५ ते ७ वयाच्या मुलांसाठी फक्त पहिल्या वेळेस फी नसते.

Child Aadhaar

तसंच १५ ते १७ वयाच्या मुलांसाठी जर आधार कार्ड एकदाच अपडेट करायचं असेल तर फी नसते. त्यानंतर मात्र १०० रुपये फी भारावी लागते.

Child Aadhaar

डेमोग्राफीक अपडेटसाठी म्हणजेच जर मुलांच्या नावात, लिंग, जन्म तारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा ईमेल यामध्ये सुरुवातीलाच बदल केला तर त्याची वेगळी फी नसते. पण जर हे स्वतंत्ररित्या अपडेट केलं तर यासाठी ५० रुपये इतकी फी असते.

Child Aadhaar

मेंदूचं तुमचं सर्वकाही! त्याला ताजंतवानं कसं ठेवाल?

येथे क्लिक करा...