रॅपर नाही तर बिग बॉसची शेरनी आर्या जाधवने घेतलंय 'या' क्षेत्रात शिक्षण

kimaya narayan

बिग बॉस मराठी सीजन 5 गाजतोय पण या घरातील एका स्पर्धकाने घरातून निष्कासित होऊनही तिची लोकप्रियता कायम टिकवली आहे. ही स्पर्धक आहे आर्या जाधव.

आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यामुळे तिला बिग बॉस मराठीच्या घरातून काढून टाकण्यात आलं होतं.

नऊवारी या रॅपमुळे आर्या घराघरात पोहोचली तर बिग बॉस मराठीच्या घरातील तिचा परफॉर्मन्स गाजला त्यामुळे तिला शेरनी हे नाव प्रेक्षकांनी ठेवलं.

निक्कीबरोबरची तिची दुष्मनी गाजली. वेळोवेळी ती निक्कीविरोधात स्टॅन्ड घेताना दिसली.

आर्या जाधवने नुकतंच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिचं शिक्षण किती झालंय याविषयी खुलासा केला. आर्या आर्किटेक आहे. 2023 मध्ये तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं.

पण तिने संगीतक्षेत्रातच काम करायचं ठरवलं असून देशभरात तिचे शो होत असतात.

रितेश बिग बॉस मराठी सोडून गेला कुठे ? - येथे क्लिक करा