Pranali Kodre
बिग बॉस मराठीचा पाचवा सिजन ७० व्या दिवशी म्हणजेच ६ ऑक्टोबर २०२४ रोजी संपला.
या सिजनमध्ये बिग बॉसच्या घराचे लाईट्स बंद करण्याचा मान टॉप-२ मध्ये राहिलेल्या सुरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांना मिळाला.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिजनच्या विजेत्याचा मान सूरज चव्हाणला मिळाला.
तसेच उपविजेता गायक अभिजीत सावंत (1st Runner up) ठरला.
विशेष म्हणजे अभिजीतचा ७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो.
त्यामुळे त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याला बिग बॉस मराठीचा उपविजेता ठरण्याचा मान मिळाला आहे.
अभिजीत हा इंडियन आयडलच्या पहिल्या सिजनचाही विजेता आहे.
अभिजीत मोहब्बते लुटाऊंगा हे गाणं प्रचंड हिट झालेलं आहे. याशिवाय देखील त्याने सर सुखाची श्रावणी, लफ्झो मे केह ना सकू, जुनून अशीही काही हिट गाणी गायली आहेत.