Anuradha Vipat
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी मुंबईतील मुलुंड परिसरात १० नवे फ्लॅट खरेदी केले आहेत.
या फ्लॅटची किंमत २४.९५ कोटी रुपये आहे.
ओबेरॉय एटेर्निया नावाच्या प्रकल्पात त्यांनी १० फ्लॅट खरेदी केले आहेत.
ओबेरॉय रियल्टीचा प्रोजेक्ट एटेर्नियामध्ये रेडी-टू-मूव्ह-इन ३ बीएचके आणि ४ बीएचतके अपार्टमेंट आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बिग बी नव्या संपत्ती खरेदी करताना दिसत आहेत.
बच्चन दाम्पत्याने २०२० ते २०२४ या कालावधीत रिअल इस्टेटमध्ये २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
मुलुंड पश्चिम भाग हा विकसीत होत आहे.