अभिषेक बच्चनने एकाच वेळी खरेदी केले 'एवढे' आलिशान फ्लॅट

Anuradha Vipat

ओबेरॉय रियॅल्टी

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने मुंबईतील बोरिवली परिसरातील ओबेरॉय रियॅल्टीच्या ओबेरॉय स्काय सिटी या प्रकल्पात १५.४२ कोटी रुपयांना सहा फ्लॅट खरेदी केले आहेत

फ्लॅट खरेदी

माहितीनुसार अभिषेकने ३१,४९८ रुपये प्रति चौरस फूट दराने एकूण ४,८९४ चौरस फूट रेरा कार्पेटचे हे फ्लॅट खरेदी केले आहेत

सहा अपार्टमेंट

बोरिवली पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या या इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर हे सहा अपार्टमेंट आहेत.

नोंदणी

२८ मे २०२४ रोजी या सहा अपार्टमेंटची नोंदणी करण्यात आली असून त्यात १० कार पार्किंगची सुविधा आहे.

ऑक्युपेशन सर्टिफिकेट

अभिषेक बच्चनने ज्या इमारतीत सहा फ्लॅट खरेदी केले आहेत त्या इमारतीला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले आहे. 

माहिती जाहीर

अभिषेक बच्चनच्या घर खरेदीच्या वृत्तावर अद्याप ओबेरॉय रियॅल्टीकडून काहीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

गुंतवणूक

 वडिलांप्रमाणेच अभिषेकलाही गुंतवणूक करण्याची आवड आहे.

रिंकूच्या वडिलांना हवाय असा जावई

येथे क्लिक करा