Pranali Kodre
भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात १०० धावांनी दणदणीत विजय मिळवला.
भारताच्या या विजयात अभिषेक शर्माने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याने ४६ चेंडूत शतक केले होते.
अभिषेकने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतकही ठरले. हे शतक त्याच्यासाठी विक्रमी ठरले.
अभिषेक झिम्बाब्वेविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक करणारा पहिलाच खेळाडू ठरला.
टी२० पदार्पणानंतर केवळ दुसऱ्याच डावात शतक करणाराही तो भारताचा पहिलाच खेळाडू आहे. यापूर्वी दीपक हुडाने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणानंतर तिसऱ्या डावात, तर केएल राहुलने आंतरराष्ट्रीय चौथ्या डावात शतक केले होते.
३५ चेंडू - रोहित शर्मा (श्रीलंका)
४५ चेंडू - सूर्यकुमार यादव (श्रीलंका)
४६ चेंडू - के. एल. राहुल (वेस्ट इंडीज)
४६ - अभिषेक शर्मा (झिम्बाब्वे)
यशस्वी जयस्वाल - २१ वर्षे २७९ दिवस
शुभमन गिल - २३ वर्षे १४६ दिवस
सुरेश रैना - २३ वर्षे १५६ दिवस
अभिषेक शर्मा - २३ वर्षे ३०७ दिवस