Sudesh
पृथ्वीवर कित्येक ठिकाणी ज्वालामुखींचे उद्रेक पहायला मिळतात. कितीतरी देशांमध्ये यामुळे मोठं नुकसान होतं.
भारतात अशा प्रकारे ज्वालामुखींच्या उद्रेकाची बातमी आपण कधी ऐकली नाही.
मात्र भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून एक ज्वालामुखी सक्रिय आहे. याचा उद्रेक झाल्यास भीषण परिणाम होऊ शकतात.
असं म्हटलं जातं की यापूर्वी 1787 साली या ज्वालामुखीमधून धूर अन् लाव्हा बाहेर निघताना पाहिलं गेलं होतं.
भारतातील एकमेव ज्वालामुखी हा अंदमान-निकोबार बेटांच्या पूर्व भागात आहे. बॅरन आयलँडवर हा ज्वालामुखी आहे.
संपूर्ण दक्षिण आशियामधील हा सध्याचा एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे हा ज्वालामुखी कधीही फुटू शकतो, अशी चिंता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास त्याचा प्रभाव संपूर्ण दक्षिण आशियावर पडेल. याचा सर्वाधिक धोका अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरला बसेल.