Anuradha Vipat
बॉलीवूड अभिनेता आमिर खानने मुंबईत मालमत्ता खरेदी केली आहे.
सध्या अभिनयातून ब्रेकवर असलेल्या आमिर खान रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे.
आमिरने मुंबईतील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पाली हिल भागात अपार्टमेंट खरेदी केले आहे.
या अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
आमिरने पाली हिलमध्ये खरेदी केलेली नवीन मालमत्ता ‘रेडी-टू-मूव्ह-इन’ आहे.
त्याच्या या अपार्टमेंटची किंमत ९.७५ कोटी रुपये आहे.
आमिर खानकडे १८६२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.