Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेता फरदीन खानने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता.
फरदीन खानने हा ब्रेक जवळपास १४ वर्षांचा घेतला होता.
आता त्याने एका मुलाखतीत ब्रेक का घेतला हे सांगितले आहे.
मुलाखतीमध्ये फरदीन खान म्हणाला की, आम्हाला मुल हवे होते. त्यावेळी आम्ही खूप प्रयत्न करूनही मुल होत नव्हते. शेवटी आम्ही लंडनला गेलो. तिथे आम्हाला एक खूप चांगला डॉक्टर भेटला
मुलाखतीमध्ये फरदीन खान म्हणाला की, त्यानंतर २०१३मध्ये आयव्हीएफच्या माध्यमातून आमच्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर २०१७मध्ये आम्हाला दुसरा मुलगा झाला.
फरदीन खानने मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, मुलीच्या जन्मानंतर त्याला केवळ दोन वर्षांचा ब्रेक घ्यायचा होता. मात्र, तो ब्रेक पुढे लांबतच गेला.
फरदीन खानने मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, मला दोन्ही मुलांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्यायचा होता. काश, मी कामातून एवढा मोठा ब्रेक घेतला नसता.