Anuradha Vipat
नुकत्याच अभिनेता कपिल होनरावने त्याच्या पत्नीसोबतचा करवा चौथचा फोटो पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी त्याला तुफान ट्रोल केलं.
‘मराठी संस्कृती विसरत चालला आहात’, असे कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं.
या ट्रोलिंगला वैतागून अखेर कपिल होनरावने सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता कपिल होनराव
करवा चौथनिमित्त कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नीसोबतचे काही फोटो पोस्ट केले.
पोस्ट करत कपिलने म्हटलं आहे की, वीट आलाय यार या लोकांचा. माझी बायको नॉर्थ साइडची आहे. हिंदी भाषिक आहे. हा तिचा सण आहे. जसं ती मराठी सण साजरे करते माझ्यासोबत तसं हा सण पण मी तिच्यासाठी करतो.
पुढे पोस्ट करत कपिलने म्हटलं आहे की, माझी मराठी परंपरा, मराठी संस्कृती आहे हे नाही करायचं हे नाही ना बोलू शकत. थोडं तरी सामान्य व्यवहारज्ञान वापरा