सकाळ डिजिटल टीम
नाना पाटेकर हे कायमच त्यांच्या अजरामर व्यक्तिरेखांसाठी ओळखले जातात. नुकतंच 'द लल्लनटाप'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ज्येष्ठ दिवंगत अभिनेते राजकुमार यांचा खास किस्सा शेअर केला.
राजकुमार आणि नाना यांनी तिरंगा या सिनेमात एकत्र काम केलं होतं.
त्यांचा हा सिनेमा खूप गाजला होता आणि या सिनेमातील त्या दोघांच्याही भूमिका खूप गाजल्या. आजही अनेकजण हा सिनेमा आवर्जून पाहतात.
सिनेमाचं शूट सुरु असतानाची एक खास गोष्ट नानांनी या मुलाखतीमध्ये शेअर केली.
नानांनी सांगितलं कि, "त्यावेळी प्रत्येकजण स्वतःच्या घरून जेवणाचा डबा आणायचे आणि आम्ही एकत्र जेवण जेवायचो. "
"एकदा मला माझ्या आईने केळफुलाची भाजी दिली होती. मी डबा उघडून खात असताना राजकुमार यांनी माझ्याकडे माझ्या डब्यातील पदार्थ चाखून बघण्यासाठी मागितला."
"मी त्यांना डबा दिला. त्यांनी भाजी चाखली आणि त्यांना खूप आवडली. ते म्हणाले, तुझ्या आईने मस्त खिमा बनवलाय. मी म्हंटल कि ती केळफुलाची भाजी आहे. त्यावर ते म्हणाले, नाही हा चिकन खिमाचं आहे. त्यांनी ते आवडीने खाल्लं."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.