Anuradha Vipat
अभिनेता राजकुमार राव लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याने स्टारकिडने चित्रपट हिसकावल्याचा खुलासा केला आहे. निर्माता करण जोहरसोबतच राजकुमारने ही मुलाखत दिली आहे.
मुलाखतीत करण म्हणाला, “कधी कधी ज्यांना यश मिळालंय, तेसुद्धा म्हणतात की मला इंडस्ट्रीबाहेरून आल्याची वागणूक मिळाली किंवा स्टारकिडमुळे माझी संधी हुकली.
यावर उत्तर देताना राजकुमार म्हणाला, “मी जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा मलासुद्धा हेच सांगण्यात आलं की मला पार्ट्यांमध्ये उपस्थित राहावं लागेल.
पुढे राजकुमार म्हणाला की, पण हे खरंय की मला रातोरात एका चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. एका स्टारकिडने माझी जागा घेतली होती. हे अजिबात योग्य नव्हतं.
याआधी दिलेल्या एका मुलाखतीतही राजकुमारने घराणेशाहीवर टीका केली होती.