Anuradha Vipat
बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व सध्या विविध कारणांमुळे गाजत आहे.
आता अभिनेता रणवीर शौरीने केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे.
रणवीर शौरीने अरमान मलिकजवळ आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
रणवीर शौरीने म्हटले आहे की, मला बिग बॉस विजेत्याची ट्रॉफी नको आहे, मला त्याबरोबर मिळणाऱ्या रकमेची गरज आहे. २५ लाख रुपये मला मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे
रणवीर शौरी नुकताच बिग बॉसच्या घराचा नवीन प्रमुख बनला असून त्याबरोबर मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा आनंद घेताना दिसत आहे.
या आधीदेखील रणवीर शौरीने माझ्याकडे इंडस्ट्रीमध्ये भरपूर काम असते तर मी बिग बॉसच्या शोमध्ये कशाला आलो असतो असे म्हटले होते.
रणवीर शौरीने बिग बॉसच्या घरात आपल्या खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत