बिग बॉसला धक्का देणारे रितेश भाऊ कुठे गायब झालेत?

kimaya narayan

अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टबरोबरच बिग बॉस मराठी सीजन 5 मुळेही चर्चेत आहे.

रितेशचा भाऊचा धक्का चांगलाच गाजतो पण गेल्या दोन आठवड्यापासून रितेश भाऊच्या धक्क्यापासून दूर आहे.

अनेकांना रितेश कुठे आहे ? त्याने भाऊचा धक्का का घेतला नाही असा प्रश्न पडला होता.

पण त्याचं उत्तर अखेर मिळालं आहे. रितेश सध्या त्याच्या कुटूंबाबरोबर क्वालिटी टाइम घालवतोय. तो सध्या संपूर्ण कुटूंबाबरोबर लंडनमध्ये असून त्याने तिथे फुटबॉलची मॅच एन्जॉय केली.

सोशल मीडियावर जिनिलियाने मॅचचे फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी कमेंट करत ते रितेशला बिग बॉसमध्ये मिस करत असल्याचं म्हटलं.

आता ग्रँड फिनालेसाठी तरी रितेश बिग बॉसमध्ये परत येणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

शाहरुख घेणार निवृत्ती ? - येथे क्लिक करा