Anuradha Vipat
अभिनेता समिर सोनीने आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
समिरने अभिनेत्री आणि त्याची पत्नी नीलमबरोबरचे नाते कसे जुळले यावर बोलताना म्हटले आहे की, जेव्हा नीलमने त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती तिची मैत्रीण आणि निर्माती एकता कपूरबरोबर होती.
नीलम ८०-९०च्या दशकात आघाडीची अभिनेत्री होती. अशा अभिनेत्रीकडून माझे कौतुक होणे, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती असंही पुढे समिर म्हणाला
पुढे समिर म्हणाला की, त्यानंतर मला एका ज्योतिषाने सांगितले की न अद्याक्षरावरुन नाव असणारी मुलगी माझ्या आयुष्यात येईल.
पुढे समिर म्हणाला की, त्यावेळी ज्यातिषाने मला तसे सांगितल्यावर माझ्या मनात लगेच नीलमचा विचार आला. पण त्यावेळी वाटले हा निव्वळ योगायोग आहे.
पुढे बोलताना समिरने म्हटले आहे की, त्यानंतर दीड वर्षानंतर एका दिवाळी पार्टीत आमची भेट झाली.
समिर आणि निलमने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली असून त्यांना अहाना नावाची मुलगी आहे.