Anuradha Vipat
मराठी अभिनेता सुबोध भावेने पुण्यात मतदान केल्यावर प्रतिक्रिया दिली आहे
सुबोध म्हणाला, “मला लोकशाहीने जो हक्क दिलाय, त्यानुसार माझ्या एका मताची किंमत खूप मोठी आहे याची जाणीव मला आहे.
आपण दिलेल्या मतांच्या आधारे आमदार, खासदार निवडून येतात. आपण मत न दिल्याने काय फरक पडणार आहे, असा निराशावादी विचार करून तुम्ही घरात बसून राहिलात तर त्याने कोणताही बदल घडणार नाही असंही यावेळी सुबोध म्हणाला आहे
यावेळी पुढे बोलताना सुबोध म्हणाला, मतदान हे आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे जे आपण पार पाडायला पाहिजे. कोणतीही आस्थापना, कोणतीही संघटना, कुठलीही कंपनी तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही.
मतदान राष्ट्रीय कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, आपल्याला योग्य वाटणारा उमेदवार आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम करू शकतो,” असं सुबोध भावे म्हणाला.
फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल विचारलं असता सुबोध म्हणाला, “मला त्याविषयी काहीच बोलायचं नाही. मला त्याबद्दल शून्य इंटरेस्ट आहे