सलमान-विवेकमुळे ऐश्वर्या राय सेटवरच सर्वांसमोर रडली; म्हणाली, 'त्यांनी जे काही केलं ते...'

सकाळ डिजिटल टीम

घटस्फोटाच्या अफवांमुळं अभिनेत्री चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या अफवांमुळं चर्चेत आहेत. मात्र, या जोडप्यानं आतापर्यंत यावर मौन बाळगलंय.

Actress Aishwarya Rai

ऐश्वर्या पुन्हा चर्चेत

अभिषेक बच्चनपूर्वी ऐश्वर्या सलमान खान आणि विवेक ओबेरॉयसोबतच्या नात्यामुळं चर्चेत होती.

Actress Aishwarya Rai

अभिनेत्री सेटवरच सर्वांसमोर रडली

दोघांसोबत ब्रेकअप झाल्यानंतरही ऐश्वर्याला मीडियाच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. एकदा अभिनेत्री सेटवरच सर्वांसमोर रडली होती.

Actress Aishwarya Rai

त्या वक्तव्यामुळे ऐश्वर्या झाली उद्ध्वस्त

वास्तविक, विवेक ओबेरॉय आणि सलमान खानने ऐश्वर्या रायसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर अनेक वक्तव्ये केली होती. सलमान आणि विवेकच्या वक्तव्यामुळं ती उद्ध्वस्त झाल्याचं बोललं जात होतं.

Actress Aishwarya Rai

'मी माझं आयुष्य हवं तसं जगत आहे'

स्वतः ऐश्वर्यानं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिची व्यथा मांडली होती. ती म्हणाली, 'मी माझं आयुष्य मला हवं तसं जगत आहे. मला आशा आहे की, इतरही असेच करतील.'

Actress Aishwarya Rai

ऐश्वर्या सलमान-विवेकवर नाराज

याशिवाय, ऐश्वर्यानं सलमान आणि विवेकवर नाराजी व्यक्त करत म्हटलं की, 'त्यांनी जे काही केलं ते अत्यंत अशोभनीय आणि असभ्य होतं. कोणताही चांगला गृहस्थ अशा गोष्टी करणार नाही.'

Actress Aishwarya Rai

सलमानवर मारहाणीचा आरोप

ऐश्वर्या आणि सलमान खान जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. अभिनेत्रीनं त्याच्यावर मारहाणीचा आरोपही केला होता.

Actress Aishwarya Rai

ब्रेकअपसाठी विवेक ओबेरॉय जबाबदार

सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपसाठी विवेक ओबेरॉयला जबाबदार धरलं जातं. 2007 मध्ये ऐश्वर्यानं अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. त्यानंतरही अशा चर्चा सुरुच आहेत.

Actress Aishwarya Rai

Wow किती क्यूट दिसतेयस! पांढरा टी-शर्ट अन् जिन्स..; पाहा अभिनेत्रीचा हॉट अंदाज

Actress Aamna Sharif | esakal
येथे क्लिक करा