Anuradha Vipat
अभिनेत्री अक्षया नाईक सध्या ट्रोलिंगमुळे चर्चेत आली आहे.
लठ्ठपणावरून सतत ट्रोल करणाऱ्या एका व्यक्तीला अक्षयाने सोशल मीडियाद्वारे सडेतोड उत्तर दिलं आहे.
अक्षयाची ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.
अक्षयाने थेट सोशल मीडियावर संतप्त भावना व्यक्त करत मुंबई पोलिसांना पोस्ट टॅग केली आहे.
अक्षयाने संबंधित व्यक्तीने केलेल्या कमेंटचे स्क्रीनशॉर्ट आणि अकाउंटची माहिती दिली आहे.
अक्षया नाईक पोस्ट करत म्हणाली, मी खूप भाग्यवान आहे की मी सोशल मीडियावर बॉडी शेमिंग / ट्रोलिंगचा सामना केला नाही.
अक्षया नाईक पोस्ट करत म्हणाली, पण यावेळी मला त्या व्यक्तीला बोलावेसे वाटते कारण टिपण्या,बॉडी शेमिंगमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्यांचाही उल्लेख आहे आणि हे मी सहन करू शकत नाही.