सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री नफिसा अली, जिनं आधी चित्रपटांमध्ये काम केलं आणि नंतर राजकारणात प्रवेश केला.
कोलकात्यात जन्मलेल्या नफिसाला पोहण्याची खूप आवड होती. ती राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिपची विजेतीही होती. 1976 मध्ये जेव्हा या अभिनेत्रीनं 'मिस इंडिया'चा खिताब जिंकला, तेव्हा बड्या कलाकारांना तिच्या सौंदर्याचं वेड लागलं होतं.
एका मासिकात प्रसिद्ध झालेला फोटो पाहून ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते राज कपूर इतके प्रभावित झाले की, त्यांनी अभिनेत्रीला त्यांचा मुलगा ऋषी कपूरसोबत चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. पण, अभिनेत्रीच्या वडिलांनी आपल्या मुलीला चित्रपटात काम करताना बघायचं नाहीये, असं सांगत ही ऑफर नाकारली.
वडिलांच्या निर्णयामुळं अभिनेत्री ऋषी कपूरसोबत 'हिना' चित्रपटात काम करू शकली नाही, ज्याची नफिसाला आजही खंत आहे.
पण, जेव्हा ही अभिनेत्री 21 वर्षांची झाली, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला स्वतंत्र दिलं आणि नफिसाला स्वतःचे निर्णय घेण्याची परवानगीही दिली. नंतर नफिसा मुंबईला शिफ्ट झाली.
यानंतर अभिनेत्रीला 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. नफिसानं कर्नल आरएस सोढीशी लग्न केलं, जे तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठे होते.
नफिसा राजकारणातही सक्रिय झाली. तिने आधी काँग्रेस पक्षातून राजकारणात प्रवेश केला, पण काँग्रेस सोडल्यानंतर तिने सपामध्ये प्रवेश केला. 2021 मध्ये नफिसानं ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये प्रवेश केला.
नफिसा अली सांगते, 'मी लहान होते, तेव्हा मला रेल्वे स्टेशनवर चाय-चाय हा शब्द ऐकायला खूप आवडायचं. रांचीजवळील मकलाशी गंज रेल्वे स्टेशनवर मी तीन-चार दिवस चहा ही विकला. ट्रेन आली की, मी ट्रेनच्या खिडक्यांजवळ जाऊन चाय-चाय करायचे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.