सकाळ डिजिटल टीम
आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, त्यांनी वयाच्या 9 व्या वर्षी चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. अरुणा इराणी (Aruna Irani) असं त्यांचं नाव आहे.
दिलीप कुमार यांच्या 'गंगा जमुना' या चित्रपटातील बालकलाकाराच्या ऑडिशनसाठी मुलांना बोलावण्यात आलं होतं. ऑडिशनसाठी आलेल्या शेकडो मुलांच्या गर्दीत 9 वर्षांची अरुणा इराणीही उपस्थित होती.
दिलीप कुमार यांची तिच्यावर नजर पडताच त्यांनी या अभिनेत्रीला चित्रपटात घेतलं.
यानंतर अभिनेत्रीला सातत्याने चित्रपटांमध्ये भूमिका मिळू लागल्या आणि तिने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. अभिनेत्री मोठी झाल्यावरही तिला कामाची कमतरता नव्हती.
पण, या अभिनेत्रीनं त्यांच्या कारकिर्दीत बहुतेक नकारात्मक भूमिका केल्या. या पात्रांनी त्यांची प्रतिमाही खराब केली होती.
एका शोमध्ये अभिनेत्रीनं सांगितलं होतं की, नकारात्मक भूमिकांमुळं माझी प्रतिमा इतकी खराब झाली की, अनेकदा महिला माझ्याशी बोलणं टाळायच्या. पण, नंतर या लोकांनी आम्हाला आणि आमचं पात्र समजून घेतलं आणि माझ्यावर खूप प्रेम करु लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.