Anuradha Vipat
मराठी कलाविश्वातील अभिनेत्री अश्विनी कासारला रेल्वे प्रवासादरम्यान चुकीचा अनुभव आला आहे.
अश्विनीने याबद्दल इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
हा घडला प्रकार आपल्या चाहत्यांना सांगत अश्विनीने या संबंधित पोस्टमध्ये मुंबई व रेल्वे पोलिसांना टॅग केलं आहे.
अश्विनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “या बाईंचं नाव मला माहित नाही. ट्रेनमध्ये यांना माझ्या सीटवर पाय समोर ठेऊन बसायचं होतं. मी नकार दिल्यावर मला लाथ मारण्यात आली.
पुढे अश्विनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, भांडणात मी मराठी भाषा वापरली तर त्यांना त्याचाही प्रॉब्लेम होता. मी पब्लिक इमेज आहे हे कळल्यावर मला धमक्या देण्यात आल्या. व्हिडीओ आणि पोस्ट
अश्विनीने या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ आणि पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.
घडलेल्या प्रकरणाची दखल घेतली जावी म्हणून अश्विनीने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलिसांना सुद्धा टॅग केलं आहे.