Anuradha Vipat
अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिचा साखरपुडा मोडल्याची घोषणा केली आहे.
तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जोडीदाराशी लग्न करणार नसून ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
भाग्यश्री मोटे हिने १० ऑक्टोबर २०२२ रोजी विजय पालांडेबरोबर साखरपुडा केला होता.
गेल्या काही वर्षांपासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते.
साखरपुड्यानंतर जवळपास दीड वर्षांनी ती व विजय वेगळे झाले आहेत. तिने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे
ती व विजय चांगल्या कारणांसाठी वेगळे होत असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.