Anuradha Vipat
होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने आता निरोप घेतला आहे
झी मराठी वाहिनीवर होम मिनिस्टरचा शेवटचा विशेष भाग पार पडला.
यामध्ये विजेत्या वहिनींना सव्वा लाखाची पैठणी मिळणार होती.
यामध्ये नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेत्री भूमिजा पाटीलने ती सव्वा लाखाची पैठणी जिंकली.
त्यानंतर भूमिजाने या पैठणीसाठी खास पोस्ट केली आहे.
आदेश बांदेकर यांच्या 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाचा पहिला भाग 13 सप्टेंबर 2004 मध्ये भेटीला आला होता.
आता हा प्रवास संपला असून 20 वर्षांनी आदेश भावोजींनी गृहिणींचा निरोप घेतला आहे